इतर

‘विठ्ठलराव शिंदे’ सहकारी साखर कारखाना युनिट १ व २ कडून १५ जानेवारी अखेर संपूर्ण ऊस बील व तोडणी वाहतूक पेमेंट अदा -आ.बबनराव शिंदे

टिम : विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब या कारखान्यास सन २०२१-२२ गळीत हंगामामध्ये १५ जानेवारी २०२२ अखेर गाळप झालेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट व ऊस तोडणी वाहतूक बीले अदा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.१ व २ चे ऊस गाळप जोमाने सुरू असून आजअखेर युनिट नं.१ कडे १२ लाख ८२ हजार २०० मे.टन तर युनिट नं.२ कडे ३ लाख ९२ हजार ७६१ मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामासाठी युनिट नं.१ कडे २० लाख व युनिट नं.२ कडे ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केलेले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे जानेवारी अखेर गाळपास आलेल्या सभासद, ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या संपूर्ण ऊसाचे प्रति मे.टन रू.२१००/- प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे.

तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहूतक करणार्‍या कंत्राटदारांचे जानेवारी अखेर संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आलेली आहेत. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक मंडळाने नेहमी उत्तम आर्थिक नियोजन करून वेळेत ऊस व तोडणी वाहतूक बिले देणेची परंपरा कायम राखलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी व इतर यांची कारखाना व संचालक मंडळाविषयीची विश्वासार्हता वाढलेली आहे. या हंगामअखेर पर्यंत गळीतास येणार्‍या ऊसाची व तोडणी वाहतूक बिले वेळेत ऊस पुरवठादार शेतकरी व कंत्राटदारांना अदा करण्यात येतील अशी माहीती त्यांनी दिली.

सन २०२१-२२ गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ठ पुर्तीसाठी युनिट नं.१ व २ चे कार्ययक्षेत्रातील सभासद, ऊस पुरवठादार यांनी कारखान्याकडे नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळप मार्च २०२२ अखेर पर्यंत करण्याचा कारखान्याचा मानस आहे तरी सर्व सभासद, ऊस पुरवठादार यांनी संपुर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!