महाराष्ट्र

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान.

टीम: विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेकडून सन २०२०-२१ हंगामात केलेल्या उच्चांकी साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथक क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ मध्ये उच्चांकी साखर निर्यात केलेबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेकडून राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला होता. सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खा.शरदचंद्रजी पवार, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, साखर संघ मुंबई अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नॅशनल फेडरेशनचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांचे शुभहस्ते व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांचे मार्गदर्शनाखाली १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये ७७ हजार ५५३ मे.टन युनिट नं.१ पिंपळनेर व ४ हजार ६३९ मे.टन युनिट नं.२ करकंब येथील अशी एकूण ८२ हजार १९२ मे.टन साखरेची निर्यात केलेली आहे. निर्यात करण्यात आलेल्या साखरेमध्ये ६९ हजार ७४५ मे.टन कच्ची साखर व १२ हजार ४४६ मे.टन पांढरी साखरेचा समावेश आहे. विठ्ठलराव  शिंदे कारखान्यास यापूर्वी देश व राज्य पातळीवरील एकूण २० पुरस्कार प्राप्त झालेले  आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथील कारखान्याची यशस्वी घौडदौड चालू आहे.

सदर पुरस्कार वितरण समारंभासाठी कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, रमेश येवले-पाटील, प्रभाकर कुटे, शिवाजी डोके, वेताळ जाधव, लक्ष्मण खुपसे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, मार्केटींग ऑफिसर नागेश नायकुडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!