निमगाव व परिसरात झालेल्या जोरदार पावसाने निमगाव – पिलिव वाहतूक ठप्प

टीम विजयदिप न्यूज.
निमगाव ता माळशिरस येथे शनिवारी सायंकाळी 5. 15 मिनिटांनी सुरू झालेला पाऊस जवळपास 7.00 वाजेपर्यंत सलग दोन तास मुसळधार सुरू असल्याने निमगावच्या घुमेरा ओढ्याच्या पुलावरून पाणी गेल्याने शनिवारी सायंकाळी 7.00 वाजल्यापासून निमगाव -पिलीव वाहतूक ठप्प झाली असून मुसळधार पावसाने घुमेरा ओढा दुथडी भरून वाहत आहे.
या वर्षातील सर्वात मोठ्या पाऊसाची निमगाव व परिसरात नोंद झाली असून या पावसामुळे अगोदरच ओव्हरफ्लो झालेला निमगावचा 248 एम सी एफ टी च्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने निमगावच्या घुमेरा ओढ्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे विजांच्या कडकडाटासह सायंकाळी 5.00 वाजता सुरू झालेला पाऊस 7.00 वाजेपर्यंत एक सारखा तसाच होता यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अनेकांच्या शेतात पाणी शिरले आहे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे सतत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः मेटाकुटीला आणले आहे