रयत क्रांती संघटनेच्या ओबीसी सेल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी मोहन सुतार.

टीम विजयदिप न्यूज.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन सुतार यांची निवड पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

रयत क्रांती संघटना महाराष्ट्र भर शेतकर्यांसाठी काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा ऊस दर, एकरकमी एफआरपी व दुध दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे या संघटनेत काम करण्यासाठी युवक वर्गाचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतेच श्रीपुर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन सुतार यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची रयत क्रांती संघटनेच्या ओबीसी सेल सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कैतुक व अभिनंदन केले जात आहे.

यावेळी बोलताना सुतार म्हणाले की, यापुढे शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य माणूस यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी छगन पवार, नंदुरबार व्यवहारे, सुधाकर पांढरे, बंडा नवगिरे, संदिप लांडगे, जीवन मोहिते आदी उपस्थित होते.