धरण पाणीसाठामहाराष्ट्र

उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ.

धरण लवकरच शंभरी पार करणार.

टीम विजयदिप न्यूज.

काल शुक्रवार रात्री व शनिवार पहाटेपर्यंत उजनीच्य‍ा बॅक वॉटर क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली असुन उजनी धरणातील पाणीसाठ्याची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.

मागील कांही दिवस विश्रांती घेतलेल्या वरूनराजाने धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रावरती काल रात्री दमदार हजेरी लावल्यामुळे काल शुक्रवार सायं.६ ते आज शनिवार स.६ या १२ तासात उजनी धरणातील पाणीसाठा जवळपास २ टक्‍क्‍यांनी वाढण्यास मदत झाली आहे. आज शनिवार स.६ वा. धरणाची टक्केवारी ९४.३० टक्के एवढी झाली असून धरण लवकरच शंभर टक्के होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.

दरम्यान काल रात्री उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पळसदेव येथे १०० मि.मी, भिगवण येथे ९१ मि.मी तर प्रत्यक्षात धरणावरती भिमानगर येथे १२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तसेच उजनीत दौंड येथून येणारा विसर्ग ३ हजार ९१७ क्युसेक्स एवढा आहे.

आज शनिवार स.६ वा. उजनी धरणाची पाणी पातळी ४९६.५७० मीटर, एकूण पाणीसाठा ३२३३.५६ द.ल.घ.मी (११४.१८) टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा १४३०.७५ द.ल.घ.मी (५०.५२) टीएमसी एवढा झालेला असून धरणाची टक्केवारी ९४.३० टक्के एवढी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!