सोलापूर जिल्हा

कल्याणराव काळे यांच्यावर राष्ट्रवादीचे विशेष लक्ष – पालकमंत्री दत्तात्रय भरणे.

टीम विजयदिप न्यूज.

कल्याणराव काळे यांच्यावर राष्ट्रवादीचे विशेष लक्ष असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व विषय थांबवत अजित पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विषयाकडे विशेष लक्ष देऊन त्यावर सविस्तर चर्चा करावी अशी आग्रही भूमिका घेतली साखर कारखान्या संदर्भातील अडचणी लवकरच दूर होतील. त्यासंदर्भातील विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय मांडल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाने  अनुमोदन दिले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

वाडीकुरोली (ता.पंढरपूर) येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.  याप्रसंगी आ. बबनदादा शिंदे, आ.शहाजीबापू  पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, पंढरपूर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, अशोक घोगरे, युवा गर्जनेचे संस्थापक समाधान काळे, सरपंच अर्चना काळे, उपसरपंच अर्चना पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  

निर्मलग्राम वाडीकुरोली ग्रामपंचायतीत कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली महिलांचे नेतृत्व सत्तेत आहे. काळे यांच्या मार्गदर्शनाखालीच चार कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये पिराची कुरोली-भंडीशेगांव रस्ता, शेळवे-वाडीकूरोली रस्ता सुधारणा, वाडीकूरोली ते राज्य मार्ग १५ ला जोडणारा रस्ता, स्मशानभूमी सुशोभिकरण, दलित वस्ती सुधारणा या विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की वाडीकुरोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणराव काळे आणि ग्रामपंचायतीवर कारभार करत असलेल्या सर्व महिला कारभारी सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळेच अनेक विकास कामे या गावांमध्ये होत आहेत. वाडीकुरोली गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया काळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!