सोलापूर जिल्हा

राहुल खटके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड.

टीम विजयदिप न्यूज.

जांबुड(ता.माळशिरस) येथील राहुल खटके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महीबुब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पक्षनिरीक्षक शरद लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गणेश पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राहुल खटके यांनी अनेक वर्षांपासून आ.बबनदादा शिंदे व उत्तमराव जानकर  यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आहे. त्याचबरोबर अनेक समाजोपयोगी उपक्रम व विधायक कामे केल्याने आजवर त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आ.बबनदादा शिंदे, माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रदेशाध्यक्ष महीबुब शेख, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गणेश पाटील,   माळशिरस तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, दादासाहेब नायकुडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज शिंदे, गजानन पाटील आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!