इतर

उजनीत दौंड येथून येणार्‍या विसर्गात वाढ.

उजनी पाणीसाठ्यात संथगतीने वाढ.

टीम विजयदिप न्यूज.

सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणामधील पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. उजनी धरण आज शनिवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ६४.१५ टक्के एवढे झाले असून भीमा खोर्‍यात सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे उजनी धरणात दौंड व बंडगार्डन पुणे येथून येणार्‍या विसर्गात वाढ होऊ लागलेली आहे. दौंड येथील विसर्ग ६ हजार ३४ क्युसेक्स तर बंडगार्डन पुणे येथील विसर्ग ८ हजार ४३६ क्युसेक्स एवढा झालेला आहे.

आज शनिवार ११ सप्टेंबर रोजी उजनी धरणाची पाणी पातळी ४९५.०८५ मी. एकूण पाणीसाठा २७७६.१२ द.ल.घ.मी म्हणजेच ९८.०३ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ९७३.३१ द.ल.घ.मी म्हणजेच ३४.३७ टीएमसी एवढा असून धरणाची टक्केवारी ६४.१५ टक्के एवढी आहे.

भीमा खोर्‍यातील सर्वात मोठे धरण हे उजनी धरण असून धरणाची पाणीसाठवण क्षमता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ४७.१३ टक्के एवढा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भीमा खोर्‍यात दमदार पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!