इतर

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ.

भीमा व नीरा खोर्‍यातील पावसाचा जोर कमी.

टीम विजयदिप न्यूज.

मागील तीन दिवसांपासून भीमा व नीरा खोर्‍यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या दोन्ही खोर्‍यातील धरणामधील पाणीसाठा झपाट्याने वाढलेला पहावयास मिळत आहे. असे असले तरी आज दिवसभर या दोन्ही खोर्‍यात पर्जन्यमान कमी झालेले आहे.

मागील तीन दिवस भीमा व नीरा खोर्‍यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोर्‍यातील २० धरणात शनिवार २४ जुलै रोजी सायं.६ वाजेपर्यंत तब्बल ७८.९१ टीएमसी एवढ्या प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा झाला असून नीरा खोर्‍यातील गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर या ४ धरणात मिळून ३३.७८ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तसेच वीर धरणाच्या सांडव्यामधून नीरा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग रात्री ८ वा कमी केला असून धरणाच्या सांडव्यातून ५ हजार १७८ क्युसेक्स तर विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स असा एकूण ५ हजार ९७८ क्युसेक्स विसर्ग नीरा नदीत सोडला जात आहे.

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणक्षेत्रात आज पावसाचा जोर कमी झालेला आहे परिणामी भीमा खोर्‍यातील सर्व २० धरणाच्या धरणक्षेत्रात आज शनिवार २४ जुलै रोजी सकाळी ६ ते सायं.६ या १२ तासात फक्त २५८ मी.मी तर नीरा खोर्‍यात ४ धरणाच्या धरणक्षेत्रात ७७ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. परंतु पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरीदेखील मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याची आवक जास्त असल्यामुळे या दोन्ही खोर्‍यातील धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे.

भीमा खोर्‍यातील सर्वात मोठे धरण असणार्‍या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे. आज सायं. ६ वा. पुणे बंडगार्डन येथील विसर्ग कमी होऊ लागलेला असून तो २१ हजार २७७ क्युसेक्स एवढा होता. तर उजनीत दौंड येथून ६९ हजार ३३९ क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०.०३ टीएमसी तर धरणाची टक्केवारी १८.७२ टक्के एवढी झाली आहे. उजनी धरणात येणार विसर्ग असाच कायम राहिला तर येत्या दोन दिवसात धरण ५० टक्क्यावरती पोहचेल.

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिति, आजचा पाऊस व धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येत असलेला विसर्ग.

शनिवार दि.२४ जुलै २०२१ सायं.६ वा. अपडेट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!