नीरा–देवघर धरणावरती विक्रमी पाऊस

भाटघर, नीरा-देवघर, वीर व गुंजवणी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ.
नीरा खोर्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात २.८८ टीएमसी वाढ.
टीम विजयदिप न्यूज
निरा खोऱ्यातील निरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून निरा-देवघर धरणावरती मागील २४ तासात विक्रमी २४९ मी.मी पाऊसाची नोंद झाली असून खोर्यातील गुंजवणी, भाटघर, व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्यामुळे या सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरू असून बुधवार २१ जुलै स.६ ते गुरुवार २२ जुलै स.६ पर्यंत या तिन्ही धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा २०.५३ टीएमसी एवढा झालेला असून एकूण सरासरी टक्केवारी ४२.५१ टक्के एवढी आहे.
२१ जुलै सकाळी ६ वा पासून २२ जुलै सकाळी ६ या २४ तासात नीरा खोर्यातील धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात २.८८ टीएमसी एवढी वाढ झालेली आहे. जर का पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या आठवड्यात ही धरणे पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी २२ जुलै २०२० रोजी गुंजवणी १.८५ टीएमसी, भाटघर ८.७७ टीएमसी, नीरा-देवघर २.७२ टीएमसी व वीर धरणात ३.६६ टीएमसी असा एकूण १७ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा होत त्या तुलनेत आज २२ जुलै २०२१ रोजी या धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा २०.५३ टीएमसी एवढा आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २२ जुलै २०२१ रोजी निरा खोर्यातील धरणामध्ये ३.५४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा जास्त आहे.
नीरा खोर्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी स.६ ते गुरुवारी स.६ वा. पर्यंत पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. धरणाचे नाव २४ तासातील पाऊस कंसात १ जून पासूनचा एकुण पाऊस
भाटघर ३२ मि.मी(३०० मि.मी)
नीरा देवघर २४९ मि.मी (९९४ मि.मी)
वीर ९ मि.मी (२०९ मि.मी)
गुंजवणी ११५ मि.मी(७३९ मि.मी) अशाप्रकारे नोंद झालेली आहे.
धरणाचे नाव | टक्केवारी | उपयुक्त साठा टीएमसी मध्ये |
गुंजवणी | ५१.३० | १.८९ |
भाटघर | ३५.२७ | ८.२९ |
निरा-देवधर | ४८.३६ | ५.६७ |
वीर | ४९.८३ | ४.६८ |
एकूण | २०.५३ |