दलित महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ स्मृतिदिना निमित्त; राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार प्रदान.

टीम विजयदिप न्यूज.
माळखांबी (ता. माळशिरस) येथे दलित महासंघ व योद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारी संकटाच्या काळात उल्लेखनीय योगदानाबद्दल राजमाता जिजाऊ स्मृतिदिना निमित्त राज्यस्तरीय कोवीड योद्धा पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कोविड योध्दा पुरस्कार श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक सारिका शिंदे, डॉ.बाळकृष्ण गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी झगडे, पोलीस पाटील अमोल शेळके-पाटील, अभिनेते संदीप गांधी, डॉ.नागनाथ दगडे, डॉ.छाया दगडे, डॉ.विनोद शिंदे, अशोक पताळे, अशोक पाटील, दत्तात्रय लोखंडे, आरोग्य सेविका डी.आर जाधव, अंबिका जावीर, उज्वला खंडागळे, उषा शिंदे, उमा चव्हाण, ग्रामपंचायत शिपाई पोपट सरतापे, मारुती साठे यांना देण्यात आला. यावेळी दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांच्या हस्ते कोविड योद्यांना हार,शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, योद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे, माळखांबी सरपंच मंगलताई पुजारी, उपसरपंच प्रभाकर गमे-पाटील, माजी शिक्षण समिती अध्यक्ष महादेव गमे-पाटील, बापूसाहेब वाघमारे, रुक्मिणीताई रणदिवे, डॉ.नितीन कुबेर, किरण भांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी साठे यांनी केले तर आभार दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बच्चन साठे यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी महादेव साठे, विकास साठे, कुमार साठे, गणेश साठे, सोमनाथ साठे, बाळासाहेब साठे, केशव शिंदे यांनी परिश्रम घेतले.