माळशिरस तालुका

माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांचे जनसेवेचे व्रत कायम जपले जाईल.- संकल्प डोळस.

टीम विजयदीप न्यूज.

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार कै. हनुमंतराव डोळस यांच्या स्मरणार्थ दसुर (ता.माळशिरस) येथील स्वर्गीय कलावती डोळस चॅरीटेबल ट्रस्ट व एन.आर.अग्रवाल इंडस्ट्रीज यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील विविध रुग्णालयात २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांच्या उपस्थितीत दसुर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर कारोनाचा  प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता  सर्वसामान्य लोकांना  ऑक्सीजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी  माळशिरस तालुक्याचे माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांच्या ५९ व्या. जयंती निमित्त २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपविभागीय अधिकारी शमा पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रेनिक शहा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापू ओव्हाळ आदींच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अक्षय भांड, गणेश वाघमोडे, किरण सावंत, रवि माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांनी तालुक्यातील गरजू रुग्णांना मदत करण्याची भूमिका कायम जतन केली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हे २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेसाठी सज्ज केले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस यांनी सांगितले. माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांचे जनसेवेचे व्रत कायम जपले जाईल असा शब्द  संकल्प डोळस यांनी यावेळी दिला. यावेळी माजी आमदार कै.हनुमंत डोळस यांना श्रद्धा सुमने अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!