तोंडले येथे हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण यांच्या तैलचित्राचे प्रकाशन.

टीम विजयदिप न्यूज.
तोंडले (ता.माळशिरस) येथे श्रीमंत सरदार विठोजीराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच शिवभक्त किरण भांगे यांच्या संकल्पनेतुन श्रीमंत सरदार विठोजीराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सरदार चव्हाण यांच्या तैलचित्राचे प्रकाशन करण्यात आले.

ज्यांनी हिंदवी स्वराज्याची प्रामाणिक सेवा केली असे हिंमतबहाद्दर चव्हाण घराणे हे तोंडले-बोंडले (ता.माळशिरस) येथील महाराष्ट्रातील एकमेव घराणे आहे. हिंमतबहाद्दर चव्हाण या घराण्यातील चार पिढ्या युद्धात धारातिर्थी पडलेल्या आहेत. सरदार विठोजीराव चव्हाण यांनी संताजी घोरपडे यांच्यासोबत औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापूण आणला होता. या पराक्रमामुळे छ.राजारामांनी ‘हिंमतबहाद्दर’ किताब बहाल केला. या अजरामर स्मृती जोपासण्यासाठी हिंमतबहाद्दर चव्हाण यांच्या तैलचित्राचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.हनुमंत निकम महाराज, दत्तात्रय गोरे, हिम्मतबहाद्दर सरदार चव्हाण यांचे वंशज शहाजीराव(नाना) चव्हाण, संजय विठ्ठल चव्हाण, चेअरमन दिपक चव्हाण, मा.उपसरपंच हरिभाऊ चव्हाण, अभिमान चव्हाण, राजुनाना चव्हाण, भर्तरीनाथ चव्हाण, संदिप चव्हाण, बापुराव चव्हाण, अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर केशव चव्हाण, सचिन भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण, डाॅ.विक्रांत चव्हाण, शहाजी मारुती चव्हाण, जगन पवार, जयंत चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अवि साठे, अभि कांबळे, निलेश कांबळे, मोहन नाईकनवरे इ.उपस्थित होते. या कार्यक्रमां प्रसंगी किरण भांगे, निकम महाराज यांनी मनोगत तर आभार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.