सोलापूर जिल्हयातील १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध.
टीम विजयदिप न्यूज.
महाराष्ट्र शासनाने राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून लसीचा तुटवडा असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ठरावीकच डोस उपलब्ध झाले होते. परंतु आता सोलापूर जिल्ह्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोवॅक्सिन लसीचे १२ हजार डोस उपलब्ध झाले असून त्यापैकी ३ हजार डोस सोलापूर महानगर पालिकेस तर उर्वरित ९ हजार डोस सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागास दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली आहे.
या लसीचे लसीकरण दि.८ मे पासून १२ मे पर्यंत म्हणजेच ५ दिवस केले जाणार आहे. या लसीसाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करून व अपॉइंटमेंट घेऊनच लसीकरणास यावे. तसेच नोंदणी केलेल्या लाभार्थीनाच बुकिंग प्रमाणे लसीकरण होईल. On spot Registration सोय नसल्याने ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांनाच निवडलेल्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहू लसीकरण केले जाणार असून यामध्ये ४५ वर्षावरील लाभार्थीना लसीकरण केल जाणार नाही. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थीचा लसीकरण सत्राचा नियोजिती कार्यक्रम खालील प्रामाणे आहे.
