अर्शविकार (मुळव्याध)- डॉ.जयंत चव्हाण.

टीम विजयदिप न्यूज.
नेहमीच परीक्षकांच्या भुमिकेत असणार माझा शिक्षक मित्र विचारत होता भारतामध्ये सर्वात जास्त पसरणारा आजार कोणता? मी मधुमेह व हृदयरोग असे योग्य उत्तर दिले. तो म्हणाला पुढचा प्रश्न विचारू का? विचार सर्वात जास्त लपविणारा जाणारा आजार कोणता? मी म्हणालो मुळव्याध अगदी बरोबर खलखळून हसून मित्राने दाद दिली आणि हे अगदी खरे आहे म्हणूनच याला बोलीभाषेत अवघड जागेचे गुप्त आजार असे म्हणतात.
आपल्याकडे तर तपासनीविणा या आजारावर उपचार घेणार्यांची संख्या खूप आहे. चरकसंहिता, सुश्रुत संहिता या वैद्यकशास्त्रावरील आद्य ग्रंथामध्ये अर्शविकार या नावाने हा आजार सविस्तर वर्णन केलेला आहे. यामध्ये सुश्रुत संहितेमध्ये एक सुंदर अर्थपूर्ण श्लोक आहे.
\\ देवा वर्ष त्यपि यथा भुमौ बिजानी कानिचित \\
\\ शरदे प्रतिरोहन्ति तथा व्याधीसमृद्धव \\
ज्याप्रमाणे जमिनीत पडून रहाणारे बीज पावसानंतर शरदऋतुमध्ये प्रत्यक्ष उगवते त्याचप्रमाणे रोगाची कारणे अगोदरच शरीरात बीज रूपाने असतात योग्य कळवधीनंतर रोग दिसतात.
अर्शाची कारणे
चरकाचार्य व सुश्रुताचार्यानी मंदाग्नी हे मुख्य कारण सांगितले आहे. चांगली भूक न लागणे, आयोग्य आहार, आहारात तंतुमय पदार्थ कमी असणे, कमी पाणी पिणे, आहारात पातळ पदार्थ कमी व तेलकट तुपकट पदार्थ जास्त, जास्त मांसाहार, शाबूदाना, बेसन, पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीज पदार्थांचे जादा सेवन इत्यादी मुळ कारणे व्याधीस कारणीभूत ठरतात. तसेच रात्रीचे जागरण, अवेळी घेतला जाणारा आहार, अति शितपेयांचा वापर व तो वारंवार होणे, मद्यपान, वाढलेले पार्टिकल्चर तसेच हॉटेल फुड ही महत्वाची कारणे आहेत.
निदान परिमार्जन हा आजार बरा करण्याचा पहिला उपाय आहे. व प्रतिबंधासाठी वरील गोष्टी टाळणे आजारापासून दूर राहण्यासाठी व बरे होण्यासाठी आवश्यक आहेत.
पूर्व लक्षणे
शौच प्रक्रियेस वेळ लागणे, शौस साफ होण्यासाठी जास्तीचा जोर द्यावा लागणे ही रोगाची पूर्व लक्षणे असतात. तसेच प्रत्यक्ष लक्षणामध्ये शौचाचेवेळी रक्त जाणे, वेदना होणे, शौचाची जागा सुजणे, शौचाची जागा बाहेर येणे तसेच सुजलेले कोंब बाहेर येणे इत्यादी लक्षणे दिसतात.
उपचार
आयुर्वेदामध्ये मूळव्याधाचे उपचार चार प्रकारे सांगितलेले आहेत.
\\ भेष जंक्षारो अग्नि शस्त्रंमिती \\
औषध, क्षार, अग्नि व शत्र आजाराची अवस्था प्राथमिक असेल तर दीपन(भुक वाढविणारी), पाचन (पचन करणारी), अनुमोलन(शौच पातळ व सहज बाहेर काढणारी) औषदाने चांगला फरक पडतो. पुढील अवस्थेमध्ये क्षारलेपन व शलाकेव्दारे अग्निकर्म सांगितले आहे.
सद्या Sclerotherapy व Laser हे चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही शेवटची उपचार पद्धती आहे. Anal dilatation, litigation, haemoridectomy या शस्त्रक्रिया आहेत. परंतु आजार होवू नयेत म्हणून थोडी काळजी घेतल्यास निश्चितपणे मूळव्याधीपासून दुर राहता येते.
टाळण्यासाठी
रोजच्या आहारात भरपूर पाणी, ताक, सरबत, पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये घ्यावीत तसेच काकडी, गाजर, टोमॅटो, बीट रोज सॅलेड म्हणून रोज घ्यावे, त्याचबरोबर शक्यतो हॉटेलची जेवणे टाळावीत तसेच मांसाहार मर्यादित असावा, शितपेय मद्यपान टाळावे, जागरणे टाळावीत तसेच नैसर्गिक शौचास वेग आल्यानंतर शौचास जावे व कृत्रिम जोर लावू नये. हल्ली खाणे वेळी-अवेळी चालते पण शौचास सकाळीच व्हायला हवी हा अट्टहास निश्चितपणे मूळव्याधीस कारणीभूत ठरतो.
लेखक –
डॉ. जयंत चव्हाण,
सुश्रुत पाईल्स हॉस्पिटल, बोंडले,
ता.माळशिरस, जी.सोलापूर.
मो. ८७८८४६१०२४.