माळशिरस तालुका

माळशिरस तालुका ग्रामविकासासाठी १ कोटी निधी मंजूर. – आ.राम सातपुते.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या २५/१५ योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी मंजुर झाला आहे. येत्या कांही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होणार आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी हा निधी आणण्यात यश आले असल्याची माहिती आ.राम सातपुते यांनी दिली.

ग्रामीण भागातील अनेक रस्ते व विविध विकासकामांसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो, तालुक्यातील विविध गावांमधील अंतर्गत येणारे रस्ते खडीकरण, पाण्याची टाकी बांधणे, संरक्षण भिंत बांधणे व सभामंडप बांधणे आदी कामे यातून मार्गी लागणार आहेत. तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आ.राम सातपुते यांनी सांगितले.

२५/१५ या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १ कोटी निधींमध्ये खालील कामांचा समावेश आहे.

मौजे माळीनगर येथील चारी नं २१ रस्ता ते सुनील एकतपुरे वस्ती रस्ता तयार करणे
मौजे दसुर येथील अर्जुन सावंत वस्ती रस्ता ते वंदना कागदे रस्ता खडीकरण करणे
मौजे कण्हेर येथील गिरवी रस्त्यावरील महादेव मंदिर ते लक्ष्मीनगर चौक रस्ता डांबरीकरण करणे
मौजे तामशिदवाडी येथे तानाजी नरुटे वस्ती ते नारायण सालगुडे वस्ती रस्ता खडीकरण करणे
मौजे तामशिदवाडी येथे संजय दाभाडे वस्ती येथे पाण्याची टाकी बांधणे
मौजे भांबुर्डी येथील मेन कॅनॉल ते सर्जेराव वाघमोडे वस्ती खडीकरण करणे
मौजे पुरंदावडे येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधणे
मौजे गोरडवाडी येथील म्हसवड रोड ते भीमराव माने व कोकरे वस्ती रस्ता खडीकरण करणे
मौजे उंबरे (द.) मेदड येथील भगवान नारनवर वस्ती येथे रस्ता खडीकरण करणे
१०मौजे खुडूस येथील हांडे वस्ती ८ फाटा ते भवानी माता मंदिर ते पुणे-पंढरपूर रोड खडीकरण करणे
११मौजे कण्हेर येथील जाधववाडी कण्हेर रस्ता ते धर्मराज माने वस्ती रस्ता खडीकरण करणे
१२मौजे नातेपुते डॉ.चौधरी घर ते आनंद नगर वसाहत रूपनवर भाऊसाहेब घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे
१३मौजे खुडूस येथे संत सावता माळी मंदिर बोरकर वस्ती ते महालिंगेश्वर मंदिर रस्ता खडीकरण करणे
१४मौजे फडतरी (नेटवेवाडी) मारुती मंदिर परिसरात सभामंडप बांधणे
१५मौजे पिंपरी बाळूमामा वाडी येथे सभामंडप बांधणे
१६मौजे बचेरी येथे तुळजाभवानी मंदिर (वसंत माने वस्ती शेजारी ) येथे सभामंडप बांधणे
१७मौजे पुरंदावडे पालवेवस्ती चिंचणी मायक्का मंदिर समोर सभामंडप बांधणे

आदी कामांसाठी आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!