इतर
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ.

टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज गुरुवारी दि.१५ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने १४६ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज अखेर ११२३ झालेली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल ७१७ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
माळशिरस तालुक्यात कोविड-१९ संसर्गामुळे बाधित होणार्या रुग्णांची संख्या दिवसेन-दिवस वाढत चाललेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
