माळशिरस तालुका

माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचे नवे १०२ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चाललेली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज ७१४ नवीन रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यात आज नवीन १०२ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील आठवड्यापासून माळशिरस तालुक्यात कोविड-१९ केसेस मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आजच्या अहवालानुसार तालुक्यात एकूण १०२  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

            काल शुक्रवारी माळशिरस तालुक्यात १४३ रुग्ण तर आज तालुक्यात कोरोनाचे नवे १०२ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!