महाराष्ट्र

भाजपला झटका! अखेर कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेशाचा मुहूर्त ठरला .

टीम विजयदिप न्यूज.

      सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार दि.०८ एप्रिल रोजी स.९.०० वा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार भगिरथ भालके यांचे उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

      पंढरपूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झालेनंतर राजकीय वर्तुळामध्ये कल्याणराव काळे यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षापुर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. विठ्ठल परिवारातील घटक असलेल्या श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांनमधून रेटा वाढत होता तर दुसरीकडे भाजपा मधील वरिष्ठ नेते त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून मनधरणी करीत होते. मागील आठवडाभरातील चर्चेनंतर काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेशी चर्चा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

      पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश पॅलेस येथे पक्ष प्रवेश होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!