चालत्या कारने अचानक घेतला पेट; कार आगीत भस्मसात.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
टीम विजयदिप न्यूज.
सांगोला-अकलूज या मार्गावरती वेळापूर जवळ दु.२.४५ वा. च्या दरम्यान आज शुक्रवार दि.०२ एप्रिल रोजी स्कोडा कंपनी च्या कारने अचानक पेट घेतला यात कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी दुपारच्या दरम्यान वाडेगाव (ता. सांगोला) येथील कलिंदर सरदार मुलाणी हे कुटुंबासह सांगोला येथून वेळापूर मार्गे अकलूज कडे निघालेले असताना वेळापूर जवळ असलेल्या सूर्या-विजय ढाब्याजवळ कार आल्यावर कारने अचानक पेट घेतला यामध्ये स्कोडा कंपनीची एम-एच-०२ बीटी०००२ ही कार आग मोठ्या प्रमाणात लागल्याने जागीच जळून खाक झाली.

या कारमध्ये ५ ते ६ जण आणि लहान मुले प्रवास करत होती. कारने अचानकपणे पेट घेतल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी कारमध्ये बसलेल्या लोकांना व मुलांना बाहेर काढले व पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आग मोठ्या प्रमाणात लागल्याने सदर स्कोडा कार जागीच जळून खाक झाली.
सदर घटनेचे वृत्त वेळापूर पोलीस स्टेशन येथे समजताच पोलीस नाईक अनिल बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके, पोलीस कॉस्टेबल नवनाथ थिटे, तसेच निसार शेख सह स्थानिकांनी गाडीला लागलेली आग विझवली.