माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ.

टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेन-दिवस वाढ होत असुन आज शुक्रवार दि.०२ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल १०५ रुग्ण सापडले आहेत. तसेच माळशिरस तालुक्यात गत दोन ते तीन दिवसापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवार दि.०१ एप्रिल रोजी तालुक्यात ७५ तर आज शुक्रवार दि.०२ एप्रिल रोजी तब्बल १०५ नवे रुग्ण सापडले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी दिली.
तालुक्यातील नागरिकांनी यापुढे फिजिकल डिस्टन्स, मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर प्रभावीपणे करावा तसेच गर्दी टाळावी. त्याचबरोबर कुठलीही लक्षणे असल्यास त्वरित आपल्या गावातील कुठल्याही शासकीय आरोग्य संस्थेची संपर्क साधावा. तसेच आपल्या घरातील पन्नास वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्ती व जुने आजार असणाऱ्या व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या ४५ वर्षे वयापेक्षा जास्त सर्व व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात आले आहे.
लसीकरण हे अतिशय सुरक्षित व प्रभावी असल्याचे शासनाने वारंवार सांगितले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. गेले वर्षभर जसे सहकार्य करत आहात तसेच सहकार्य यापुढेही काही दिवस करावे ही नम्र विनंती. आपणा सर्व सन्माननीय याच्या सहकार्यामधून आपण निश्चितच या परिस्थिती मधून लवकरच बाहेर येऊ असा विश्वास आहे.
डॉ.रामचंद्र मोहिते ,
तालुका आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती, माळशिरस.




